breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह, फडणवीसांनी रसद पुरवली; संजय राऊतांचे सनसनाटी आरोप

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप केला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर संजय राऊतांनी भाष्य केलंय. भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. सामनाच्या रविवार विशेष ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊतांनी मोठा आरोप केला आहे. याचसोबत लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

जूननंतर भाजपात मोदी- -शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी- शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या वासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस पराभवासाठी यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे…

हेही वाचा – पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर शहरात मोठी कारवाई, तब्बल 49 पब आणि बार सील

अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम ४ जूनला दिसेल.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची राजवट ४ जूननंतर संपत आहे. याबाबत आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. या दोघांना सत्तेवरून दूर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले. मोदी व शहा यांनी देशाचा तुरुंग केला व लोकशाहीलाच बंदिवान केले. त्यामुळे मोदी-शहांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम निर्माण झाला. मोदी हे देवाचे अवतार आहेत असे चित्र निर्माण केले. त्यामुळे घरात अन्न, वीज, पाणी, रोजगार, निवारा नाही, पण मोदी हवेत. “माती खाऊन जगू” असे बोलणारे अंधभक्त या काळात दिसले, पण ज्यांनी आतापर्यंत मोदींना मतदान केले तो शेतकरी, कष्टकरीच मोदींच्या विरोधात उभा ठाकला. मोदी यांनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button