breaking-newsमुंबईराष्ट्रिय

बीसीसीआयसह इतरांना 121 कोटी रूपयांचा दंड

मुंबई – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इतरांना तब्बल 121 कोटी रूपयांचा दंड ठोठावला. टी-20 क्रिकेटशी संबंधित 2009 मध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) स्पर्धेवेळी परकी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या आरोपावरून हे पाऊल उचलण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेत 2009 मध्ये आयपीएल स्पर्धा भरवण्यासाठी 243 कोटी रूपये हस्तांतरीत करताना फेमाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ईडी तपास करत आहे. संबंधित निधीच्या हस्तांतरणाने आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचाही आरोप आहे. त्यावरून ईडीने बीसीसीआयला 82 कोटी 66 लाख रूपयांचा दंड ठोठावला. याशिवाय, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना 11.53 कोटी रूपये, आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना 10.65 कोटी रूपये, बीसीसीआयचे माजी खजिनदार एम.पी.पांडोव यांना 9.72 कोटी रूपये तर एसबीआयमध्ये विलीन झालेल्या स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोरला 7 कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सर्वांना मिळून ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम 121 कोटी रूपयांपेक्षा अधिक भरते. संबंधितांना 45 दिवसांमध्ये सरकारी तिजोरीत दंडाची रक्कम भरण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button