breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ पाकिस्तानी सिनेमाला मनसेचा दणका

राज्यातच नाही संपूर्ण देशभरात कुठेही हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही
मुंबई :
‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानच्या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार होता, परंतु आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्याने आता या चित्रपटाचे भारतातील प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.
राजसाहेबांचा डंका, पाकिस्तानी सिनेमाला दणका मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी चित्रपटाचं प्रदर्शन आता पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे. केवळ राज्यातच नाही संपूर्ण देशभरात कुठेही हा चित्रपट आता प्रदर्शित होणार नाही. पुन्हा जर कुणाला पाकिस्तानी कलाकारांबद्दल प्रेमाचा उमाळा वगैरे आला तर त्यांच्यासाठी एवढा एक इशारा पुरेसा आहे. मनसे आंदोलनाच्या या विजयाबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन.., असं ट्विट करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार झी स्टुडिओज हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याच्या तयारीत होते, परंतु शेवटच्या क्षणी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. झी स्टुडिओजने या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळवली होती. मात्र त्यानंतर त्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलून तो 30 डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी मनसेने आक्रमक पावित्रा घेतला होता.
हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याचा विचार झाला तेव्हा राज ठाकरेंच्या मनसे पक्षाने याला विरोध दर्शवला. पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी जो चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता 30 डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही, असा अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले होते.
थिएटरमालकांना नम्र आवाहन मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका, असे ट्वीट करत मनसे नेते अमेय खोपकरांनी इशारा दिला होता.
‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाने जगभरात 10 मिलियन डॉलर म्हणजेच 220 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यामध्ये पाकिस्तानी चलनानुसार 87.50 कोटींची कमाई देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरून केली आहे. तर 132.50 कोटी रुपये परदेशातून आले आहेत. हा चित्रपट पाकिस्तानी चित्रपट इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button