ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्टटाईम नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेची एक लाख 38 हजारांची फसवणूक

पिंपरी चिंचवड| पार्टटाईम नोकरी देण्याच्या बहाण्याने तिघांनी एका महिलेची फसवणूक केली. ही घटना 17 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी मारुंजी हिंजवडी येथे घडली.

मोबाईल नंबर 7037527960, परितोष पासवान (रा. पासवान, पो. भवानपुरा, मनोजकार्तिक भागलपूर, बिहार), ब्रसेर टेक्नोजी प्रा ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी महिलेला 7037527960 या क्रमांकावरून संपर्क केला. त्यांना वर्क फ्रॉम होम नावाखाली एक लिंक पाठवली. त्यामध्ये पैसे गुंतवल्यास पार्ट टाईम नोकरी देतो, असे आरोपींनी फिर्यादी महिलेला सांगितले. महिलेकडून तब्बल एक लाख 38 हजार रुपये आरोपी परितोष याच्या बँक खात्यावर घेतले. त्यानंतर महिलेला नोकरी न देता तसेच तिचे पैसे परत न करता तिची फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button