breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांना दिलासा! धरणांमध्ये मुबलक पाणी, खडकवासला धरण 92.61 टक्के भरलं

पुणे: पुण्यातील शहराला आणि शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा जलसाठा वाढलेला आहे. धरण क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे. खडकवासला धरण तब्बल 92.61 टक्के भरले आहे. खडकवासला धरण हे लवकरच शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. खडकवासला धरणाची क्षमता 1.83 टीएमसी आहे. आज खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्याची शक्यता आहे.

पुण्यातील चारही धरणांमध्ये आतापर्यंत एकूण 16.89 टीएमसी म्हणजेच 57. 96 टक्के जलसाठा झालेला आहे. मात्र गेल्या वर्षाच्या शंभर टक्क्यांच्या तुलनेत यंदा जलसाठा कमी आहे. पानशेत धरणामध्ये 63.90 टक्के जलसाठा, वरसगाव धरणात 53.40 टक्के, तर टेमघर धरणात 38.19 टक्के जलसाठा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button