breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीची बैठक गणसंख्येअभावी तहकूब

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची बुधवारी (दि.26) नियोजित बैठक गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांच्यासह तीन सदस्य वगळता उर्वरित सर्व सदस्य बैठकीला गैरहजर राहिल्याने ही बैठक येत्या 1 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. परंतु, स्थायीच्या सदस्यांनी अचानक दांडी मारल्याने तहकूब झाल्याने ऊलट सूलट चर्चा रंगली आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीची बुधवारी दुपारी दोन वाजता नियोजित बैठक होती. परंतु, या बैठकीला स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सदस्य विलास मडिगेरी, विकास डोळस आणि सागर अंगोळकर हे उपस्थित होते. या व्यतिरिक्त सर्व सदस्य बैठकीला गैरहजर राहिले. त्यावरून गणसंख्येचा (कोरम) अभावाचे कारण देत ही बैठक 1 जानेवाररीपर्यंत तहकूब करण्यात आली.

या  बैठकीपुढे पाच ठिकाणी अर्बन पार्क स्ट्रीट विकसित करणे, सुदर्शनगर वाढीव खर्च, पाणीपुरवठा वितरणासाठी सल्लागार नेमणुकीसह विविध सल्लागार नेमणुकीचे प्रस्ताव होते. त्यात पाण्यासाठी सल्लागार नेमणूक हा विषय वादाचा ठरण्याची शक्यता आहे. मात्र, अचानक ही बैठक तहकूब झाल्याने नेमक्या कारणाबाबत महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती.

दरम्यान, मागील बैठकीत चिखलीतील 45 कोटी रुपयांच्या खर्चाचा संतपीठाचा विषय स्थायी समितीने मंजूर केला. परंतु, त्याच्या मंजुरीबाबत काही सदस्य अनभिज्ञ असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर विरोधाचा सूर घेणा-या राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून नंतर कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली. त्यावरून चर्चा टाळण्यासाठी बैठक तहकूब केल्याचे कारण असू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button