breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

अधिवेशनाला जाण्यासाठी आमदार अश्विनी जगताप आणि उमा खापरे यांचा लालपरीने प्रवास

आमदार अश्विनी जगताप आणि उमा खापरे यांचा एसटी महामंळाच्या बसने प्रवास

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना एसटीच्या तिकीटात ५० टक्के सवलत सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आणि आमदार उमा खापरे यांनी आज सकाळी मुंबईला अधिवेशनासाठी जाताना पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि माजी नगरसेविकांसोबत एसटी महामंळाच्या बसने प्रवास केला.

सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील अश्विनी जगताप आणि उमा खापरे या महिला आमदारांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या लालपरीला अर्थात एसटीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही महिला आमदारांनी आज सकाळी वल्लभनगर आगारातून लालपरीने प्रवास केला.

यावेळी पिंपरी-चिंचवडमधील महिला पदाधिकारी व माजी नगरसेविकांनीही सहप्रवासी म्हणून दोन्ही महिला आमदारांसोबत लोणावळापर्यंत प्रवास केला. त्यामध्ये माजी महापौर उषा माई ढोरे, स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, निर्मला कुटे, सविता खुळे, वैशाली जवळकर, माधवी राजापुरे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, माजी शहराध्यक्षा शैला मोळक, दिपाली धानोरकर, सुप्रिया चांदगुडे आदींचा समावेश होता.
चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, सध्याचे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार महिलांना न्याय देणारे सरकार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात या सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. या निर्णयाची आंबलबजावणी सुरू झाली. त्यातून राज्यातील माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी एसटीने प्रवास करून महिलांना दिलेल्या सवलतीच्या अंमलजावणीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे महिला प्रवाशांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

भाजप-शिवसेना युती सरकारने नेहमीच सामान्याने नेहमीच जगणे सुसह्य करणारे निर्णय घेतले आहेत. महिलांना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. आज आम्ही अधिवेशनाला जाताना पिंपरी ते लोणावळा असा महिला पदाधिकाऱ्यांसोबत एसटीने प्रवास करून महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, असं आमदार उमा खापरे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button