breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘लेकी’ संकटात; विनयभंगाचे गुन्हे वाढले

पिंपरी | प्रतिनधी

पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 8) तीन विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याबाबत नोंद झाली आहे. फिर्यादीनुसार आरोपींना अटक करून संबधित पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोहननगर, चिंचवड येथील एका युवकाला देखील विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपी हा पीडित महिलेच्या घरात घुसला. ‘माझे तुझ्यावर गेल्या पाच वर्षा पासून प्रेम आहे. तुझ्या नवऱ्याचे बाहेर लफडे आहे. तो तुला सारखा मारत असतो’, असे म्हणत तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस उपनिरीक्षक वाघमारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

विनयभंगाच्या पहिल्या घटनेत दापोडी येथील २० वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत संबंधित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले की, 8 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पीडित तरुणी पिंपळे गुरव परिसरात एक पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिथे जाऊन माझ्याशी बोलत का नाही, असे म्हणत तिच्याशी हुज्जत घातली. त्या वेळी तरुणीला फोन आला असता आरोपी पातारे याने तिच्या खिशात हात घालून फोन काढून घेतला. तसेच तिचा विनयभंगही केला.

पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.

या बरोबरच इंद्रायणीनगर, भोसरी येथील एका युवकाच्या विरोधातही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत आरोपी तरुणाने फिर्यादी पीडित तरुणीचा वेळोवेळी पाठलाग केला. तसेच तिच्याकडे एकटक पाहत तिचा विनयभंगही केला. पोलीस उपनिरीक्षक गिरनार याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button