breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘अपना भिडू! बच्चू कडू!’ राहुल गांधी प्रकरणावरून पुण्यात झळकले बॅनर

बच्चू कडू यांची आमदारकी कधी रद्द होणार?

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. दरम्यान आता याचे पडसाद पुण्यात पाहिला मिळत आहेत. पुण्यात आज शनिवारी राष्ट्रवादीकडून आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आता त्यांची आमदारकी कधी रद्द होणार असा सवाल बॅनर वरून विचारला आहे.

‘अपना भिडू! बच्चू कडू! आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’, असा बॅनरवर लिहला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button