breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार : आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार काल (२४ मार्च रोजी) सायंकाळी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे प्रदान करण्यात आला.

२०२१ या साली आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. २५ लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारचे स्वरूप होते.

माझ्या माई, बाबा आणि दिदीचा आशीर्वाद आहे, म्हणूनच आज या भव्यदिव्य ताज हॉटेलसमोरील ऐतेहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मी स्वीकारत आहे, मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि आज मला माहेरी आल्यासारखे वाटत आहे. डोक्यावरून, पाठीवरून मायेचा हात फिरवत आहेत. आजपर्यंत मी उभी आहे, गात आहे आणि तुमच्या प्रेमामुळे कायम गात राहणार आहे. महाराष्ट्र भूषण हा माझ्यासाठी भारतरत्न आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे, अशी भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button