breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा आमदार अण्णा बनसोडेंनी केला “श्रमपरिहार”

पिंपरी: गणेशोत्सवामध्ये दहा दिवसात दमलेल्या गणेश मंडळांच्या शेकडो कार्यकर्त्यांची पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी रविवारी (या.११) दखल घेतली. अशा दीड हजार कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार त्यांनी स्नेहभोजनाव्दारे दूर केला. त्यांचा हा उपक्रम सध्या शहरातील सर्व गणेश मंडळांत व कार्यकर्त्यांत चर्चेचा विषय बनला आहे.

गेली १५ वर्षे आमदार बनसोडे हे गणेश मंडळांना विविध प्रकारे मदत करीत आहेत. यावर्षी त्यांनी गणेशोत्सवात पिंपरीतील जवळपास दीडशे मंडळांना वर्गणी दिली, तर काहींना साउंड सिस्टीमसारखे साहित्यरुपी सहाय्य केले. गणेश विसर्जनानंतर दहा दिवस दमलेल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना स्नेहभोजन देण्याचा पायंडाही यावर्षी सुरु केला. त्यासाठी एक मंगल कार्यालय त्यांनी बुक केले होते. तेथे मतदारसंघातील दीड हजार गणपती मंडळ कार्यकर्त्यांचा त्यांनी श्रमपरिहार केला. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांच्या सेवेत गुंतलेल्या व विविध देखाव्यांतून त्यांचे मनोरंजन केलेल्या या कार्यकर्त्यांचेही मनोरंजन करण्याची काळजी त्यांनी यावेळी घेतली.

या उपक्रमामागील संकल्पने बाबत बोलताना ते म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे फक्त त्या दहा दिवसापूरते नसते. मंडळात निष्ठेने, निस्वार्थीपणे काम करणारे कार्यकर्ते हे वेळ पडल्यावर समाजातील विविध घटकांच्या मदतीलाही सर्वप्रथम धावून जातात. तरीही त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा सरसकट सकारात्मक नसतो. म्हणून त्यांच्या श्रमाला कष्टाला मानसन्मान मिळावा, त्यांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून हा उपक्रम सुरु केला, असे ते म्हणाले. यामुळे गणेशोत्सव साजरा करायला प्रोत्साहन मिळणार आहे, अशी भावना अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. समाधान मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, साई विश्व मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ व इतर मंडळाच्या वतीने आमदार बनसोडेंचा कृतज्ञता म्हणून यावेळी सन्मान करण्यात आला. युवा नेते सिध्दार्थ बनसोडे, लहू तोरणे, मल्लेश कद्रापूरकर, सुभाष बोरकर, शशीकांत घुले, निलेश पांढरकर, प्रसाद शेट्टी, औदुंबर कळसाईत, अभिजित वाघेरे, संजय औसरमल, सतीश लांडगे आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button