breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडपुणेमुंबईराष्ट्रिय

बेकायदा शाळा ‘पास’, प्रशासनाची कारवाई नाही : पालकांमध्येही उदासीनता

पिंपरी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित शाळा राजरोसपणे सुरू असून, पालकही या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश घेत आहेत, असे चित्र पहायला मिळत आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण सुरु होते. या सर्वेक्षणात दरवर्षी वरील शाळा अनाधिकृत मून घोषित केल्या जातात. परंतु दरवर्षी शिक्षण विभागाच्या वतीने या शाळांना नोटीस देणे, दंडात्मक करावी करणे, वया शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे जाहीर करणे. यापलीकडे शिक्षण विभागाच्या वतीने या अनधिकृत शाळांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळा राजरोसपणे चालवल्या जातात शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शाळा चालू झाल्यानंतर या शाळांना केवळ नोटीस बजावली जाते मात्र अनाधिकृत शाळांच्या वतीने या नोटीसला केराची टोपली दाखवली जाते. त्यानंतर मात्र वर्षभर या शाळा चालू राहतात व शिक्षण विभाग देखील पुढील शैक्षणिक वर्ष येईपर्यंत शांत राहतो. गेली अनेक वर्ष या शाळांवर ठोस अशी कारवाई होत नाही यातून असे दिसून येते कि अनधिकृत शाळेचा हा सगळा बेकायदेशीर कारभार महापालिकेच्या शिक्षण विभाग विभागाच्या आशीर्वादाने चालू आहे कि काय ? कारण शिक्षण विभागाला या शाळेवर खरच कारवाई करायची करायची होती तर आतापर्यंत या संस्था चालकांवर कायदेशीर कारवाई का केली नाही?, असा सवाल रयत विद्यार्थी विचार मंचतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

‘त्या’ शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करा…
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे अनाधिकृत शाळांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालकाची आर्थिक लूट करणे, विद्यार्थी पालकांना त्रास देणे असे अनेक प्रकार या अनधिकृत शाळेमध्ये घडतात. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन सर्व अनाधिकृत शाळेच्या संस्थाचालकांवरती गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. या आशयाचे पत्रही रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. ….

या शाळा आहेत अनधिकृत
शहरातील ज्ञानराज माध्यमिक शाळा (कासारवाडी), मॉडर्न पब्लिक स्कूल (रहाटणी), मास्टर केअर इंग्लिश स्कूल (भोसरी), पैंट मीरा इंग्लिश स्कुल (चिखली), एस. एस. स्कूल फॉर किड्स (सांगवी), साई स्कुल ऑफ एक्सलेन्स (पिंपळे सौदागर), सैट रोझरी इंग्लिश मिडीयम स्कुल (चिखली), माने इंग्लिश स्कुल (राजवाडेनगर, काळेवाडी या शाळा प्रशासनाने बेकायदा ठरवल्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button