breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

रेकॉर्डब्रेक! मिचेल स्टार्क ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

IPL Auction 2024 : मिचेल स्टार्कला केकेआरने तब्बल २४ कोटी ७५ लाख रूपयांना विकत घेतलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मिशेलला विकत घेण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू होती. अखेर कोलकाताने बाजी मारली आहे. दरम्यान, याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला सनरायजर्स हैदराबादने २०.५० कोटींना खरेदी केलं आहे. केकेआरने अवघ्या काही तासांत हा रेकॉर्ड मोडला.

मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली. मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. १० कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी २४.७५ कोटी रुपये खर्च केले.

हेही वाचा  –  तीन दिवसांत १४१ खासदारांचं निलंबन; शरद पवार आक्रमक, म्हणाले.. 

दरम्यान, वनिंदू हसरंगाला हैदराबादने १ कोटी ५० लाख रूपयांना खरेदी केलं आहे. चेन्नईने डॉरिल मिशेलला १४ कोटी, रचिन रवींद्रला १.८ कोटी, शार्दुल ठाकूरला ४ कोटी रूपयांना खरेदी केलं आहे. मुंबई इंडिन्सने जेराल्ड कोएत्झीला ५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. पंजाब किंग्सने हर्षल पटेलला ११.७५ कोटी, ख्रिस वोक्सला ४.२० कोटी रूपयांना खरेदी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button