breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘..तर मी २०२४ ला मुख्यमंत्री होणार’; बच्चू कडू यांचं सूचक विधान

नागपूर : अजितदादांना २०२४ मध्ये मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले. यावरून, प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मी २०२४ ला मुख्यमंत्री होणार, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

बच्चू कडू म्हणाले, माझे सात ते आठ आमदार निवडून आल्यास मी मुख्यमंत्री होऊ शकतो. देशात एच. डी. देवेगौडा यांच्याकडे केवळ ८ खासदार असताना ते पंतप्रधान झाले होते. तेव्हा मीही निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो.

हेही वाचा  –  रेकॉर्डब्रेक! मिचेल स्टार्क ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

अनाथालयातून बाहेर निघाल्यानंतर मुलींची व्यवस्था व्हावी, तिला उदरनिर्वाहाचे मार्गदर्शन मिळावे याकरिता सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. या मुलींचा प्रश्न मोठा आहे आणि जिथपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत तिची सर्व व्यवस्था सरकारने केली पाहिजे. २० वर्षापर्यंत मुलीला अनाथालयात ठेवले जाते. पण, २१ व्या वर्षी जेव्हा ती मुलगी बाहेर पडते, तेव्हा तिच्याकडे घरही नसते. या मुलीला नातेवाईक, जात, धर्म, पंथ नसतो. तिच्या राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. यासाठी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता. पण, याबाबत मंत्र्यांकडून आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. यावरून त्यांच्या मनात अनाथ मुलींबद्दल किती अनास्था आहे हे समोर आलं आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button