breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

मिशन-२०२४: शिरूर लोकसभा मतदार संघात आमदार महेश लांडगेंची वज्रमूठ!

विधानसभा प्रमुखांसह ओझरच्या गणरायाचे दर्शन : लोकसभा मतदार संघ दौरा कार्यक्रमाचा केला शुभारंभ

ओझर: भारतीय जनता पार्टी शिरूर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर लगेच आमदार महेश लांडगे यांनी मतदार संघातील सर्व विधानसभा निवडणूक प्रमुखांची बैठक घेतली. आगामी काळात भाजपा सरकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक प्रमुखांची घोषणा केली. त्यामध्ये शिरुर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी आमदार लांडगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यानंतर प्रथमच आमदार लांडगे यांनी श्रीक्षेत्र ओझर येथील विघ्नहर गणेश मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. 

यावेळी मतदार संघातील जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशा बुचके, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, हडपसर विधानसभा निवडणूक प्रमुख योगेश टिळेकर, खेड विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख, शिरुर-हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदीप कंद, लोकसभा समन्वयक ॲड. धर्मेंद्र खांडरे आदी उपस्थित होते. 

आमदार लांडगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त विधानसभा निवडणूक प्रमुखांची आज ओझर येथे बैठक झाली. आगामी काळात पक्ष संघटन आणि निवडणूक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.  मतदार संघनिहाय मोर्चेबांधणी करुन भाजपाच्या विचाराचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकोप्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

*****

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  शिरुर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपा सरकारने केलेली विकासकामे आणि कल्याणकारी योजना प्रभावीपणे लोकापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व सहकारी, पदाधिकारी आणि भाजपा विचारांचे कार्यकर्ते सक्षमपणे काम करणार आहोत. 
– महेश लांडगे, निवडणूक प्रमुख, शिरूर लोकसभा, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button