breaking-newsराष्ट्रिय

राजस्थानात धुळीच्या वादळाचे 100 बळी

लखनौ/ जयपूर- उत्तर प्रदेशाच्या काही भागात थडकलेले धुळीचे वादळ काल रात्री राजस्थानमध्ये धडकले े किमान 100 जणांचा बळी गेला आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि वीजेचे खांब कोसळले आहेत आणि वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अनेक ठिकाणी घरेही पडल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशामध्ये या धुळीच्या वादळामुळे 64 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 47 जण जखमी झाले आहेत. तर राजस्थानात 33 जण मरण पावल्यामुळे मृतांची संख्या 97 इतकी झाली आहे. तर किमान 100 जण जखमी झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात आग्रा जिल्ह्याल या धुळीच्या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या एका जिल्ह्यात 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 35 जण जखमी झाले आहेत. आग्य्राशिवाय बिजनोर, बरेली, सहारणपूर, पिलभीत, फिरोझाबाद, चित्रकूट, मुझफ्फरनगर, रायबरेली आणि उन्नाव या जिल्ह्यांनाही या धुळीच्या वादळाचा फटका बसला आहे.
राजस्थानात ढोलपूर जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील आग्य्राचे रहिवासी असलेल्या दोघांचा समावेश आहे. काही जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या एकाला जयपूरला हलवण्यात आले आहे, असे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्य विभागाचे सचिव हेमंत कुमार गेरा यांनी सांगितले. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील जिवीतहानीबाबत दुःख व्यक्‍त केले असून आपत्तीग्रस्त दोन्ही राज्यांमध्ये मदत कार्यात समन्वय राखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उत्तर प्रदेशात 64 तर राजस्थानात 33 जणांचा बळी


राजस्थानात सीमा भागात मोठे नुकसान


आग्रा जिल्ह्यामध्ये 36 मृत्यूमुखी ; 166 जनावरेही दगावली


वीजेचे खांब कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत


घरेही जमीनदोस्त; मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता


आपत्तीग्रस्तांना वेगाने मदत देण्याची पंतप्रधानांची सूचना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button