breaking-newsराष्ट्रिय

न्यायालयाचा अवमान, भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाने मागितली हायकोर्टाची माफी

भाजपाचे राष्ट्रीय सचिव एच. राजा यांनी न्यायालयाविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाची माफी मागितली आहे. सप्टेंबरमध्ये पुडुकोट्टी येथे गणेश चतुर्थी मिरवणुकीदरम्यान राजा यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातला होता. पोलीस हिंदू विरोधी आणि भ्रष्ट असल्याचे म्हटले होते. या मार्गावर मिरवणूक काढण्यास परवानगी न दिल्याने राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयाचाही अपमान केला होता.

ANI

@ANI

Tamil Nadu: BJP National Secy H Raja renders an apology before Madras HC for his derogatory remark against judiciary. In Sept during Vinayagar Chathurthi procession in Pudukottai, he had abused judiciary after police denied permission for procession to go on a particular route.

पुडुकोट्टी येथे गणपती मिरवणूक निघाली होती. एच राजा हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. संवेदनशील पुडुकोट्टी जिल्ह्यातून मिरवणूक जावी असा राजा यांचा अट्टहास होता. परंतु, पोलिसांनी याला परवानगी दिली नाही. त्यानंतर राजा यांनी प्रवेश नि मिळाल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाचा अवमान केला होता. त्यांनी न्यायालयाविरोधात टिप्पणी केली होती.

याचदरम्यान त्यांनी एका पोलिसाशीही वाद घातला होता. यावेळी पोलीस हिंदूविरोधी असल्याचे ते म्हणाले होते. याप्रकरणी आता राजा यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button