breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

Mi vs RCB : मुंबई इंडियन्ससमोर बेंगलोरचे ‘रॉयल’ चॅलेंज

दुबई –  इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या रविवारी होणार्‍या दुसर्‍या लढतीत मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स संघ (Mi vs RCB) एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माच्या मुंबई संघाला गेल्या लढतीत पराभूत व्हावे लागले. आरसीबी नऊ सामन्यांत 10 गुणांसह अव्वल चार संघात आहे. तर मुंबईचा संघ सलग दोन पराभवांनंतर आठ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.

दोन्ही संघातील शीर्ष भारतीय फलंदाजांना धावा करण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या मुंबई इंडियन्स संघासोबत अधिक पाहायला मिळत आहे. टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत कोहली, रोहित, सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. कोहलीची गेल्या सामन्यातील चेन्‍नई विरुद्धची खेळी वगळता इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. मुंबईने हार्दिक पंड्याला अजूनही अंतिम एकादशमध्ये स्थान दिलेले नाही.

कोहलीने चेन्‍नईविरुद्ध आपल्या फॉर्मचे संकेत दिले आहेत. मुंबईच्या रोहित शर्माला गेल्या लढतीत चमक दाखवता आली नाही. मुंबईसाठी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांचा फॉर्म संघाच्या द‍ृष्टीने चिंतेचा विषय आहे. आयपीएलचे दुसरे सत्र सुरू झाल्यापासून दोन्ही संघांना चेन्नई आणि कोलकाता संघाकडून पराभूत व्हावे लागले. गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास मुंबईसाठी जसप्रीत बूमराह आणि बेंगलोरसाठी यजुवेंद्र चहलने चांगली गोलंदाजी केली आहे.

हर्षल पटेलने आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक विकेट मिळवले आहेत. नवदीप सैनीला विकेट मिळवण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला आहे.

दोन्ही संघ यातून निवडणार :
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन क्रिस्टियन, रजत पाटीदार, दुष्मंथा चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन बेबी, वानिंडू हसरंगा, जॉर्ज गार्टन, यजुवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्‍कल, काइल जेमिसन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, टिम डेविड, आकाश दीप, एबी डिविलियर्स.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, क्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जेम्स नीशाम, जयंत यादव, कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, युद्धवीर सिंह, एडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मोहसिन खान, नॅथन कूल्टर-नाइल, पीयूष चावला, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button