breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास १०० रुपयांनी महागला! भाडेवाढ तत्काळ लागू

मुंबई – दररोज वाढणाऱ्या इंधन दराचा फटका आता प्रवासी वाहतुकीला बसू लागला आहे. इंधन दरवाढीमुळे मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला आहे. सर्व प्रकारच्या प्रिपेड टॅक्सी भाड्यात १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. खटुवा समितीच्या शिफारशीनुसार ही दरवाढ तत्काळ म्हणजेच शुक्रवारपासून लागू करण्यात आली आहे.

मुंबईतील इंटरनॅशनल आणि डोमेस्टीक विमानतळावरून मुंबई-पुणे जाणाऱ्या टॅक्सी भाड्यात वाढ करण्यात आल्याने आता टॅक्सी प्रवाशांच्या खिशावर भार पडणार आहे. एसी आणि नॉनएसी टॅक्सी भाड्यात १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना एसी टॅक्सीसाठी ४२५ ऐवजी ५२५ रुपये, तर नॉनएसी टॅक्सीसाठी ३५० ऐवजी ४५० रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, विम्याचा हप्ता, मोटार वाहन कर, दुरुस्ती देखभाल हा खर्च परवडेनासा होऊ लागल्याने भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे टॅक्सी चालकांकडून सांगण्यात आले आहे. खटुवा समितीच्या शिफारशीनुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. खटुवा समितीच्या शिफारशीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सीची भाडेवाढ करून प्रतिकिलोमीटर दर १६.९३ रुपये करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मुंबई-पुणे १५५ किलोमीटर अंतराकरिता परिगणना केली असता प्रतिप्रवासी भाडे ६५६ रुपये, तर कुल कॅब टॅक्सी भाडेदरात वाढ करून प्रतिकिलोमीटर २२.२६ करण्यात आले आहे.

त्याप्रमाणे मुंबई-पुणे १५५ किलोमीटर अंतराकरिता परिगणना केल्यानंतर प्रतिप्रवासी भाडे ८६३ रुपये इतके येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी प्रतिकिलोमीटर २.९४ रुपये, तर कुल कॅबसाठी प्रतिकिलोमीटर ४.८१ रुपये वाढविण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button