breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कष्टकऱ्यांच्या मदतीला कष्टकरी आले धावून

कोरोना संकटात कष्टकऱ्यांना मदतीचा हात

पिंपरी – जगभरात करोना महामारी च्या साथीने धुमाकूळ घातला आहे ,जग जणू पूर्ण ठप्प झाले आहे याचा स्वाभाविक परिणाम हातावर पोट असलेल्या घटकांवर झाला आहे. यामध्ये राज्यात परराज्यातून महाराष्ट्रात रोजीरोटी कमावण्यासाठी आलेले कष्टकरी घटक असोत किंवा आपल्याच राज्यातील बाहेरच्या जिल्ह्यातून पोट भरण्यासाठी येथे आलेले अंग मेहनती असोत सर्वांच्या रोजगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे रोज कमावलं तरच चूल पेटेल अशी अवस्था असलेल्या कामगारांची काही दिवसांपासून बिकट अवस्था होती याला अनुसरून दोनशे गरजू असंघटित कामगाराना आज अन्न धान्य वाटप करण्यात आले.

कष्टकरी घटकांना महामारी ने जगण्याचे संकट उभे केले आहे अशावेळी कष्टकऱ्यांना मदत करण्यासाठी पिंपरीचिंचवडमधील कष्टकरी संघटना हिरहिरीने पुढे आल्या आहेत याविषयी राष्ट्रीय एकात्मता समिती जशी राज्यात कार्यरत आहे त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये कष्टकरी संघर्ष महासंघाने अडचणीत सापडलेल्या कष्टकऱ्यांची माहिती घेऊन यादी तयार केली आणि कुनाल आयकाँन सोसायटी व येथील दानशूर व्यक्तींच्या, संस्थांच्या मदतीने त्यांना पॅकेज देण्याचे योजना राबवली

यामध्ये प्रामुख्याने मजूर ,मोलकरीण,बांधकाम कामगार , हमाल, विधवा महिला, निराधार यांची वस्ती निहाय यादी करून शहरातील वेताळ नगर ,रामनगर ,विद्यानगर, अजंठानगर, भोसरी, भीमशक्ती नगर, बालाजी नगर ,म. फुले नगर या परिसरातील कष्टकऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना एक महिना पुरेल इतके आवश्यक अन्नधान्य गव्हाचे पीठ ,तांदूळ ,साखर ,चहा पावडर ,खाद्यतेल, मसाले, डाळी, कडधान्य इत्यादीचे सिधा पॅकेट संबंधित वस्ती मध्ये जाऊन देण्यात आले , तीनशे कुटुंबांना लाभ मिळाला आहे ,

राष्ट्रीय एकात्मता समितीचे नितीन पवार, नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे ,कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते,यांचे मार्गदर्शनात उपक्रम राबवण्यात आला यावेळी माधुरी जालमुलावार, उमेश डोर्ले, नाना कसबे, इरफान चौधरी, राजेश माने,अर्चना कांबळे, शेषेराव गायकवाड, सुनीत पोतदार, अशोक तनपुरे,नंदकिशोर श्रीवास आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button