breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

पूल वाहून गेल्याने सातारा महाबळेश्वर रास्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

महाबळेश्वर |

महाबळेश्वरसह साताऱ्यात बुधवार (२ जून) दुपारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळेच महाबळेश्वर आणि साताऱ्याला जोडणाऱ्या रस्त्याचा काही भाग वाहून गेलाय. जावळी तालुक्यातील मांमुर्डी गावानजीकचा सातारा महाबळेश्वरला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने साताऱ्यातून मेढामार्गे महाबळेश्वरला जाणारा रास्ता बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, वाईसह सातारा परिसरात बुधवार दुपारपासून सुरु झालेला पाऊस रात्रभर जोरदार सुरु होता. या मार्गावर रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूला पाणी मोठ्या प्रमाणात वाढत गेले आणि पाण्याचा मोठा डोह तयार झाला.

बुधवारी दुपारी पडलेल्या पावसाने ओढ्या नाल्यांना पाणी आले. काही ठिकाणी रस्त्यासाठी टाकण्यात आलेला भरावही खचून वाहून गेला. त्यातच घाट रस्त्यावरही पाण्याचा दबाव वाढल्याने रस्त्याचा काही भाग वाहून गेला. मामुर्डी गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या कामाच्या इथं पाणी मोठया प्रमाणात साचले होते त्यातच पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने भराव वाहून गेला. रस्ता वाहून गेल्याने सातारा केळघर महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद झाला. त्यामुळे केळघरला जाणाऱ्यांना मेढामार्गे पर्यायी रस्ता म्हणून मोहाट- म्हाते- सावली मार्गेने जाण्याचे निर्देश देण्यात आलेत. सर्व वाहतुक या मार्गाने वळण्यात आली आहे. साताऱ्याहून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी मेढा मोहाट पुलावरून म्हाते मार्गे केळघर, महाबळेश्वर असा प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. वारंवार सूचना करूनही ठेकेदाराने वेळेत काम न केल्याने पुलाचा भराव वाहून गेला आहे. ही घटना जर रात्रीच्या वेळेस घडली असती तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते, असं सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या अनिल धनावडे यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button