ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काँग्रेसचा गुरुवारी महापालिकेवर हंडा मोर्चा

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचे काम मनपातील सत्ताधारी भाजप करीत आहे. मागील वर्षी पवना धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असतानाही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरात दररोज पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यासाठी उद्या (गुरुवारी) काँग्रेस महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार आहे.

शहरभर दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन देऊनही शहरात ठिक ठिकाणी अद्यापही टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील दाट वस्ती व झोपडपट्ट्यांमधील कमी दाबाने व अनियमितपणे पाणी पुरवठा होत आहे. यामुळेच शहरात दररोज पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी आणि मनपातील सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दिनांक 24 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button