breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुण्यात अजित पवार समर्थक नगसेवकाच्या हत्येची सुपारी; गुन्हा दाखल

पुणे । प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्यातील बाणेर भागातील विश्वासू विद्यमान नगरसेवक बाबुराव चांदेरे यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचं उघड झालं आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुंडाला देण्यात आली होती. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा मुलगा समीर याला तुमच्या वडीलांना मारण्यासाठी काही मुले बाणेर येथे आली आहेत असा एक फोन आला होता. माहिती मिळाल्यानंतर चांदेरे यांच्या घराच्या बाहेरील बाजूस एका चारचाकी वाहनात काही जण दबा धरुन बसलेले दिसले.

 चांदेरे यांच्या पत्नीने त्यांच्याकडे कोण पाहिजे अशी विचारणा केली असता त्यांनी काही न बोलता गाडी निघून गेले. यानंतर येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी अनिल यशवंते याचे साथीदार जीवे ठार मारण्यासाठी आल्याचे तक्रारदारकडून सांगण्यात आले. त्यानुसार संबधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराद्वारे देखील तपास सुरू असल्याचे चतुःशृंगी पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button