breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रियविदर्भ

रस्ते अपघातात पुढचा नंबर आमचा?; यवतमाळ-अमरावती मार्गावरील विद्यार्थ्यांचे नितीन गडकरींना पत्र

नागपूर । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यभरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांवरील हे खड्डे वाहनचालकांच्या अपघाताचे कारण ठरत आहे. यासंदर्भाता अनेकदा सर्वसामान्यांकडून आंदोलने करण्यात आली. मात्र, तरीही राज्यातील जनता चांगल्या आणि सुरळीत रस्त्यांच्या प्रतिक्षेत कायम आहे. राज्यभरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांवरील हे खड्डे वाहनचालकांच्या अपघाताचे कारण ठरत आहे. यासंदर्भाता अनेकदा सर्वसामान्यांकडून आंदोलने करण्यात आली. मात्र, तरीही राज्यातील जनता चांगल्या आणि सुरळीत रस्त्यांच्या प्रतिक्षेत कायम आहे. दरम्यान, यवतमाळ-अमरावती रस्त्यावर खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील 34 शाळा असून, विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना भावनिक पत्र लिहिले आहे.

यवतमाळ-अमरावती रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, त्यामुळे होणाऱ्या अपघातात पुढील नंबर आमचा नाही ना? अशी भीती व्यक्त करत विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील 8 हजार विद्यार्थ्यांनी गडकरी यांना पत्र लिहून दुरवस्थेबाबत माहिती दिली. 3 राज्यांना जोडणाऱ्या यवतमाळ-अमरावती मार्गावरील 34 शाळेतील विद्यार्थ्यांनी 8 हजार विद्यार्थ्यांनी गडकरींना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे.

उत्तर व दक्षिण कॉरीडोर जोडण्याच्या हेतूने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या राज्य सीमेवरील अमरावती जिल्ह्यातील धामणी तालुक्यातील भोकरबर्डी या गावापासून हरिसाल, सिमाडोह, परतवाडा, अमरावती, बडनेरा, नांदगाव खंडेश्वर, नेर, यवतमाळ, उमरीपासून पांढरकवडा तालुक्यातील करंजीपर्यंत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. मात्र, राजकीय पुढाऱ्यांच्या धोरणामुळे हा मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही.

या मार्गावर येणाऱ्या 34 शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे अखेर दोन्ही जिल्ह्यातील तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील सावरकर नगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र पाठवले आहे. यामधे विद्यार्थ्यांनी खड्डेमय रस्त्यावर दररोज प्रवास करताना होत असलेल्या त्रास आणि भीती बद्दलची व्यथाच मांडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर अपघातात अनेक शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. कदाचित पुढला नंबर आमचा तर नाही ना? असा उद्विग्न सवालही विद्यार्थ्यांनी गडकरींना विचारला आहे. यवतमाळ, नेर, नांदगाव, बडनेरा येथील विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला असून यासाठी गणेश राऊत, प्रविण पाटमासे, गौरव नाईकर, रुपेश गुल्हाने, प्रणय बोबडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button