breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत संत रोहिदास महाराजांची जयंती रक्तदान शिबीराने साजरी

पिंपरी – पिंपरी येथील संत तुकारामनगरमध्ये संत रोहिदास मंचच्या वतीने राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांची ६४४ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर व सामाजिक प्रबोधन करण्यात आले.सध्या जगात कोरोना धुमाकूळ घालत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सध्या कोरानाची दुसरी लाट आली आहे. रूग्ण संख्या वाढत आहे, रक्त पेढींना रक्त कमी पडत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मंचच्यावतीने आम्ही सर्व नियम पाळुन सकाळी ८ ते ३ वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय.सी.एम रूग्णालयातील रक्तपेढीत रक्तदान करण्यात आले. यावेळी वाय.सी.एम रक्तपेढीचे विभाग प्रमुख डॉ.लांडे, इन्चार्ज किसनराव गायकवाड उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना संविधानाची प्रत आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी श्रुष्टी सुनील रोकडे या विद्यार्थीनीला शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली. गेल्या ३० वर्षांपासून भक्ती भावाने जयंती साजरी केली जाते. यावेळी येणाऱ्या सर्व भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.यावेळी मंचाचे अध्यक्ष सुनील रोकडे म्हणाले की, जयंती निमित्त सर्व समाज बांधव आपले सर्व हेवेदावे विसरून एकत्र आल्याचे समाधान मिळाले. आमचे मंच फक्त जयंती साजरी न करता वर्षभर समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबवित असतो व यापुढे ही राबविण्यात येणार आसल्याचे अध्यक्ष रोकडे यांनी सांगितले.

यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड म्हणाले की, काशीजवळ गोवर्धनपुर येथे २५ फेब्रुवारी १४३३ मध्ये आई कामशी व वडील रघु यांच्या पोटी जन्मलेल्या या महान संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीला पाहुणे म्हणून येण्याचे मला भाग्य मिळाले.

देशात जातीयतेच्या विरोधात बंड उभारण्याची हिम्मत १४ व्या शतकात संत रोहिदास महाराज यांनी दाखवली. मनुष्य जातीने नाही तर आपल्या कर्माने माणूस लहान-मोठा होत आसतो. आपण सर्वजण समान सल्याची शिकवण संत रोहिदास यांनी दिल्याचे नगरसेविका सुजाता पालांडे यांनी यावेळी सांगितले.
कामगार नेते यशवंत भोसले यांनी संत रोहीदास महाराज यांनी जन्मपासून केलेल्या संत कार्याचे महत्त्व सांगितले.पिंपरी चिंचवड मधील, संत रोहिदास प्रतिष्ठान, संत रोहिदास विचार समिती, समाज उन्नती संस्था, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, ईत्यादी संस्था सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मंचाचे अध्यक्ष सुनिल रोकडे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, आळंदी सचिव रवी भेंकी, पंडित वनसकर, सागर भोसले, सुभाष पळशीकर, विजय गेजगे, आभिमान साबळे, अरुण बागडे, ज्ञानेश्वर कांबळे माजी अध्यक्ष चर्मोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य, नगरसेविका सुजाताताई पालांडे, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणाताई शिलवंत, कामगार नेते यशवंत भाऊ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button