breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराष्ट्रिय

PIFF महोत्सवात मराठी चित्रपट ‘मदार’ ने मारली बाजी

अभिनेता मिलिंद शिंदे यांना बेस्ट ऍक्टरसाठी पुरस्कार

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल (PIFF) हा महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान पार पडला. यामध्ये जगातील लघु चित्रपट, चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटांचे प्रदर्शन करतात. चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर चित्रपटांना नामांकित केलं जातं. यामुळे चित्रपट निर्मात्यांमध्ये नवी उर्जा आणि समाजाप्रती चांगल्या विषयावर चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच मानधन देखील मिळते.

यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे २१ वे प्रदर्शन होते. या वेळेसच्या महाराष्ट्र शासन संत तुकाराम पुणे आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचा उत्कृष्ठ चित्रपटाचा पहिला मान मंगेश महादेव बदर दिग्दर्शित ‘मदार’ या मराठी चित्रपटाला मिळाला आहे.

याचबरोबर सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक म्हणून मंगेश महादेव बदर यांना मदार चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी पुरस्कारचा मान मिळाला आहे. तर अभिनेता मिलिंद शिंदे यांना बेस्ट ऍक्टरसाठी पुरस्कार मिळाला आहे. मदार चित्रपटासाठी बेस्ट स्क्रीनप्ले पुरस्कार पंचक चित्रपटासाठी राहुल आवटे यांना मिळालेला आहे.

यंदाच्या महोत्सवात ७२ देशांतील तब्बल १५७४ एन्ट्री आल्या असून त्यापैकी १४० चित्रपट दाखवण्यात आले. यामध्ये सर्व चित्रपट A+ ग्रेडचे होते.

पुणे आंतरराष्ट्रीय पुरस्कार यादी –

प्रभात सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – बेल्जियम आणि फ्रान्स -तेरी अँड लोकिता

प्रभात सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक – मरिना गोर्बाक – क्लोंडिके

एमआयटी – एसएफटी ह्युमन स्पिरीट – क्लोंडिके

स्पेशल ज्युरी मेंशन अभिनेत्री – लुबना अझबल – ब्ल्यू काफ्तान

मराठी चित्रपट पुरस्कार –

महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट – मदार

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक – मंगेश बदर – मदार

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेत्री – अमृता अगरवाल – मदार

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेता – मिलिंद शिंदे – मदार

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बेस्ट सिनेमाटोग्राफर – आकाश बनकर आणि अजय बालेराव – मदार

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ उत्कृष्ट पटकथा पुरस्कार – राहुल आवटे – पंचक

स्पेशल मेंशन ज्युरी अवार्ड फॉर आर्ट डायरेक्टर – कुणाल वेदपाठक – डायरी ऑफ विनायक पंडित

स्पेशल मेंशन ज्युरी टू द डायरेक्टर – कविता दातिर – अमित सोनवणे – गिरकी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button