breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘छडी लागे छम छम’…आता बंद ; राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचा आदेश

मुंबई –  राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळेमधून छडी वगळण्याच्या आदेश शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.

शाळेत शिक्षकांनी मारले म्हणून विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले किंवा शिक्षेमुळे विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसला अशा विविध घटना सातत्याने समोर येऊ लागल्या. याची दखल राष्ट्रीय बालहक्क आयोगाने घेतली आणि कोणत्या प्रकारच्या शिक्षांमुळे विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो, यावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर वर्गातून छडी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय बालहक्क आयोगने केलेल्या सूचनेनुसार तसेच शिक्षण हक्क कायदा, २००९मधील अनुच्छेद १७ नुसार कोणत्याही मुलाला शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, अशी तरतदू करण्यात आली आहे. शारीरिक शिक्षांमुळे निरागस विद्यार्थ्यांच्या मनात भीती, राग, दहशत निर्माण होते. तसेच अनेक प्रकणांमध्ये आत्मविश्वासही कमी होतो. यासर्व परिणामांचा विचार करून शाळांमध्ये शारीरिक शिक्षा दिल्या जाऊ नयेत, अशी सूचना राष्ट्रीय बालहक्क आयोगने केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button