breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘सीएए’ आणि ‘एनआरसी’च्या समर्थनार्थ ‘इंद्रायणी थडी’मध्ये स्वाक्षरी मोहीम

–      आमदार महेश लांडगे यांचे मनोरंजनासह जनजागृतीला प्राधान्य

–      केंद्रातील भाजपा सरकारच्या निर्णयाला पिंपरी-चिंचवडमधून समर्थन

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

केंद्रातील भाजपा सरकारने ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ बाबत केलेल्या कायद्यांचे समर्थन करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्वांत मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’मध्ये जनजागृती आणि स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

          भोसरीचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारील गावजत्रा मैदानावर ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भरविण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण, म नोरंजन, खेळ आणि जनजागृती अशा विविधांगांनी ही जत्रा संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली आहे.

          भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची नुकतीच आमदार महेश लांडगे यांनी नुकतीच स्वीकारली. ‘बिग इव्‍हेंट’ साठी प्रसिद्ध असलेल्या लांडगे यांनी शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच कार्यक्रमात पक्षाच्या भूमिकेला सर्वसामान्य  नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचा ‘इंद्रायणी थडी’मध्ये प्रत्यय आला. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारुन रामभक्तांचे लक्ष वेधले आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारुन शिवप्रेमींना साद घातली. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या कार्याची प्रेरणा देणारा ‘ऐतिहासिक फुलेवाडा’, क्रांतिज्योती रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभारुन आमदार लांडगे यांनी जत्रेला सर्वसमावेशक प्रबोधनाचे स्वरुप दिले.

          या उपक्रमाच्या समन्वयक आणि भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश माजी सचिव वीणा सोनवलकर म्हणाल्या की,  इंद्रायणी थडी जत्रा-२०२० मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी सह्यांची मोहीम चालू आहे. पहिल्याच दिवशी या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी अक्षरश: रांगेत उभे राहून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या पमहिल्याच दिवशी या मोहिमेत दोन दिवसांत १ लाख ९ हजार नागरिकांनी सहभाग घेतला. इतक्या मोठ्या प्रमाणात ‘आय सपोर्ट सीएए’ आणि ‘साईन कॅम्पेनिंग’ला प्रतिसाद मिळत आहे. जत्रेतील चारही दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.

*****

स्वाक्षरी मोहीमेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात केली. या मोहिमेला शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे आदींनी समर्थन दिले आहे.  विशेष म्हणाजे, या मोहिमेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच, आमदार महेश लांडगे यांनीही या स्वाक्षरी मोहिमेद्वारे ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. ‘आय सपोर्ट सीएए’ उपक्रमाची धुरा भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश माजी सचिव वीणा सोनवलकर यांनी सांभाळली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button