Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय
अडीच मिनिटात तीन आंबे खा..आणि आंब्याची पोटी घेऊन जा..
पुण्यात लहान मुलांसाठी मनसेच्या वतीने 'आंबे खा' स्पर्धेचं आयोजन

पुणे : हापुस आंबा हा फळांचा राजा आहे. त्याचे नाव काढताच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पुण्यातील बालगंधर्व येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लहान मुलांसाठी ‘आंबा खा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी खास कोकणातील आंब्यांची मेजवानी मुलांसाठी ठेवण्यात आली होती. शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच मनसेच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
मनसेकडून गेल्या १४ वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेत जवळपास ४० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. अडीच मिनिटांमध्ये तीन आंबे खाण्याचा विक्रम एका मुलीने केला तिचा पहिला नंबर आल्यानंतर बक्षीस म्हणून तिला आंब्याची पेटी आयोजकातर्फ देण्यात आली.





