Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बावधन-कोथरूड क्रीडा महोत्सवाच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

The trophy unveiling ceremony : बावधन–कोथरूड परिसरात आयोजित क्रीडा महोत्सवाच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, ही आमच्यासाठी विशेष सन्मानाची बाब ठरली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून खेळाचे महत्त्व, युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यातील क्रीडासंस्कृतीची भूमिका प्रभावीपणे मांडली.

हेही वाचा –  राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी उद्या होणार मतदान; जाणून घ्या जिल्हानिहाय नावे

मोठ्या संख्येने उपस्थित असलेले क्रीडाप्रेमी नागरिक, संघांचे प्रतिनिधी आणि युवा खेळाडू यांच्यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे, तसेच सर्व मान्यवर, खेळाडू आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार. खेळ, समाज आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील. असं प्रतिपादन यावेळी आयोजकांकडून करण्यात आलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button