पुण्यात लवकरच उभारण्यात येणार देशातील पहिली सर्वात मोठी एव्हिएशन गॅलरी!

पुणे : देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर पुण्यात असल्याने, शहरात स्वतंत्र हेलिपोर्ट तयार करण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी एका ठिकाणी जागेची पाहिली आहे. याशिवाय, देशातील सर्वात मोठी एव्हिएशन गॅलरी देखील पुण्यात उभारण्यात येणार, असल्याची माहिती केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (दि. २६) पुण्यात हवाई वाहतूक आणि सहकार क्षेत्रात बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा – मुसळधार पावसाने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; नागरिकांना मोठा दिलासा
मोहोळ यांच्याशी झालेल्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे
नवी मुंबई विमानतळ:- नवी मुंबई विमानतळ ऑगस्ट अखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत सुरू होईल.
पीएमपीएमएल बस: – पीएमपीसाठी १,००० बस मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, राज्य शासनाकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत लवकरात लवकर बस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण :- पुणे विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणासाठी ओएलएस सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार भूसंपादन करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात येणार असून, यासाठी सुमारे महिनाभर लागेल. धावपट्टी विस्तारीकरणानंतर पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढवण्यात येईल.
‘उडान यात्रा कॅफे’:- पुणे विमानतळावर सुरू करण्यात आलेल्या ‘उडान यात्रा कॅफे’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, मुंबईतील विमानतळावर देखील हा कॅफे सुरू करण्यात येणार आहे.
लहान विमानतळांचा विकास:- सोलापूर, अकोला, शिर्डी यांसारख्या छोट्या विमानतळांचा विकास करून ‘उडान’ योजनेअंतर्गत विमानसेवा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
नाशिक कुंभमेळा:- नाशिक कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक येणार असल्याने, त्या पार्श्वभूमीवर देखील विमानोड्डानांचे नियोजन करण्यात येणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पुण्याची हवाई वाहतूक क्षेत्रातील वाढती भूमिका लक्षात घेऊन आम्ही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करत आहोत. पुण्यात देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर असल्याने येथे स्वतंत्र हेलिपोर्टची नितांत गरज आहे, ज्यावर आम्ही काम सुरू केले आहे. त्याचबरोबर, देशातील सर्वात मोठी एव्हिएशन गॅलरी पुण्यात तयार करून आम्ही हवाई वाहतूक क्षेत्रातील भारताची प्रगती आणि भविष्यातील शक्यता दर्शवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय हवाई राज्यमंत्री