ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या कराटेपटूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी

कु. गौरांगी गौरव गायकवाड हिची रौप्य व कांस्यपदकाची कमाई; शहरातील खेळाडूंना ६२ पदके

पिंपरी-चिंचवड | मुंबई येथील मिहिर सेन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ठक्कर मॉलसमोर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मीरा रोड क्रिडा संकुलन महाराष्ट्र येथे रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी 6th Shotokan Cup International Level Karate Tournament 2026 या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ही स्पर्धा International Shotokan Karate-Do Organization (I.S.K.O.) यांच्या वतीने WUSU International Martial Arts Association यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, जपान, भूतान, मलेशिया आणि श्रीलंका या देशांतील कराटेपटूंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत २९ सुवर्ण, १८ रौप्य आणि १५ कांस्यपदके, अशी एकूण ६२ पदके पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

हेही वाचा

होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी, ओमानमध्ये उपचार सुरू

यामध्ये पिंपरी-चिंचवड येथील कु. गौरांगी गौरव गायकवाड हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक व कांस्यपदक अशी दोन पदके मिळवली. तिच्या या यशाबद्दल पालक, प्रशिक्षक व कुटुंबीयांकडून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

स्पर्धेत Kata व Kumite या दोन्ही प्रकारांचा समावेश होता. WUSU International Martial Arts Associationच्या प्रशिक्षक निशा गुप्ता मॅडम व आशितोष दौडकर सर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच स्पर्धेसाठी आवश्यक प्रात्यक्षिक व परीक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली.

लहान वयातच कराटेसारख्या क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून, त्यांच्या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे. भविष्यात पिंपरी-चिंचवडमधून आणखी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कराटेपटू घडावेत, अशी अपेक्षा पालक व प्रशिक्षकांनी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button