ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत रामनगरी–गव्हाणे वस्तीत स्वच्छता व सुशोभीकरण

टाकाऊ वस्तूंना रंगरंगोटी करून परिसराला नवे रूप; नागरिकांना स्वच्छतेची शपथ

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधील रामनगरी–गव्हाणे वस्ती, खरात वर्कशॉप परिसरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत CTU (Cleanliness Target Unit) निश्चित करून परिसराची व्यापक स्वच्छता तसेच सुशोभीकरण करण्यात आले.

बेसिक्स टीमच्या माध्यमातून परिसरातील कचरा आणि अस्वच्छता दूर करत सार्वजनिक जागा स्वच्छ करण्यात आली. नागरिकांनी टाकून दिलेल्या वस्तूंचा कल्पकतेने पुनर्वापर करण्यात आला. या वस्तूंना आकर्षक रंगरंगोटी करून सुशोभीकरणासाठी वापरल्यामुळे परिसराला स्वच्छ आणि सुंदर रूप प्राप्त झाले.

उपक्रमादरम्यान नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याचे तसेच वर्गीकरण केलेला कचरा महापालिकेच्या घंटागाडीतच देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिकांना स्वच्छतेची शपथ देऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

हेही वाचा –  डोंबिवलीत सायबर सुरक्षेसाठी ‘सायबर वॉरियर्स’ सरसावले!

महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम, सफाई कर्मचारी, संस्थेचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे परिसरातील अस्वच्छतेचे ठिकाण स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे केंद्र बनले.

‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सभापती सौ. रेखा देवकर, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे आणि मुख्य आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आरोग्य निरीक्षक गौरव गायकवाड, रामनगरी सोसायटीचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, BVG सुपरवायझर रोहित झेंडे, प्रवीण गव्हाणे, बेसिक्स टीमचे सदस्य तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button