3री राष्ट्रीय थाई किकबॉक्सिंग स्पर्धा: महाराष्ट्राचा डंका! राष्ट्रीय विजेतेपदासह 5 टायटल बेल्टवर कोरले नाव

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी
इंडिया थाई किकबॉक्सिंग फेडरेशनतर्फे आयोजित ३री राष्ट्रीय थाई किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप व टायटल बेल्ट स्पर्धा गोव्यात मोठ्या उत्साहात पार पडली. पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापुसा येथील बॉक्सिंग हॉलमध्ये २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान रंगलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय विजेतेपद (जनरल चॅम्पियनशिप) पटकावले, तर कर्नाटक संघ उपविजेता ठरला.
भव्य उद्घाटन सोहळा
स्पर्धेचे उद्घाटन गोवा शासनाच्या क्रीडा व युवा व्यवहार विभागाचे उपसंचालक डॉ. विवेक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इंडिया थाई किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे आणि अवकारिका फाउंडेशनचे संचालक सी.ए. अरविंद भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यास रोहित पवार, योगेश कवळे, ग्रँडमास्टर समीर पांढरकर, अविनाश पवार, अभिषेक शहा, किरण माने, अमित पाल, तेजल पवार, ओम पांढरकर, सेजल पवार, नितीन शहा, कुणाल जोगदंड, आदित्य अडागळे आणि वैश्णवी भागवत यांसह विविध मान्यवर, प्रशिक्षक व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा
‘विद्या-सेतू’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
राष्ट्रीय टायटल बेल्ट विजेते
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अमॅच्युअर गटासोबतच प्रतिष्ठेच्या टायटल बेल्ट विभागात वर्चस्व गाजवत ८ पैकी ५ गटांत विजेतेपद मिळवले:
विभागवजन गटविजेता / विजेतीराज्य
महिला–५५ किलोसायली घोडकेमहाराष्ट्र
महिला–६५ किलोवैश्णवी भागवतमहाराष्ट्र
महिला+६५ किलोशरयू संतोष म्हात्रेमहाराष्ट्र
पुरुष–४५ किलोआनंद लांडगेमहाराष्ट्र
पुरुष–५५ किलोप्रतीक लांबडेमहाराष्ट्र
पुरुष–६५ किलोवैशांक प्रदीपकर्नाटक
पुरुष–७५ किलोकेशव गौतमकर्नाटक
पुरुष+७५ किलोकुणाल जोगदंडमहाराष्ट्र
उत्कृष्ट तांत्रिक व पंच नियोजन
स्पर्धेचे सामने सुरळीत पार पाडण्यासाठी अभिषेक शहा यांनी रिंग इन्चार्ज, अविनाश पवार यांनी टेक्निकल डायरेक्टर आणि समीर पांढरकर यांनी चॅम्पियनशिप सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळली. किरण माने, अमित पाल, आदित्य अडागळे, तेजल पवार आणि ओम पांढरकर या पंचांनी निष्पक्षपणे काम पाहिले.
”खेळाडूंना दर्जेदार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे आणि थाई किकबॉक्सिंग खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हेच फेडरेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व विजेत्यांचे व सहभागी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!”
- संतोष म्हात्रे, अध्यक्ष, इंडिया थाई किकबॉक्सिंग फेडरेशन.




