Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुसळधार पावसाने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; नागरिकांना मोठा दिलासा

पवनानगर : मावळवासीयांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि मागील दोन दिवस पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण जलाशयात पाणीवाढ झाली आहे.

सोमवारी (दि. २६ मे) दुपारी घेतलेल्या माहितीनुसार पवना धरणात सद्यस्थिती २६.२० टक्के इतका पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा रविवारी घेतलेल्या नोंदीपेक्षा अधिक आहे. रविवारी पवना धरणात २५.२७ टक्के पाणीसाठा होता, तर सोमवारी २६.२० टक्के पाणीसाठा दाखवत आहे. एकंदरीत मुसळधार पावसाने पवना धरणातील पाण्याची आवक वाढून धरणातील पाणीसाठ्यात जवळपास एक टक्क्याची वाढ झाली असून नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

हेही वाचा –  राज ठाकरेंनी अवघ्या तीन तासातच नाशिक दौरा उरकला, अचानक मुंबईकडे रवाना, नेमकं कारण काय?

मावळ तालुक्यातीस पवना धरणातील पाणीसाठ्यावर परिसरातील अनेक खेडी, अनेक गावच्या पाणीयोजना, लहान मोठे उद्योगधंदे, शेती आणि पिंपरी-चिंचवड शहर अवलंबून आहे. धरणातील पाणीसाठ्यात झालेल्या वाढीने सर्वांना आधार मिळाला असून पाणीटंचाईचे संकट जवळपास टळल्याचे दिसत आहे.

पवना धरण परिसरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार चोवीस तासात धरण क्षेत्रात ६५ मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला. त्यासह धरणाच्या लक्ष क्षेत्रात सर्वत्रच पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखीन वाढ होऊ शकते, असे पवना धरण शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button