Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’ पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार असून महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

महावितरण, ऊर्जा विभाग, ‘द रॉकफेलर फाउंडेशन- आरएफ’ आणि ‘ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट (जीईएपीपी)’ यांच्या सहकार्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविणार आहे. फडणवीस आणि अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव शाह यांची जानेवारी २०२५ मध्ये यासंदर्भात चर्चा झाली होती. वीज वितरण प्रणालीमध्ये डिजिटल ट्वीन वापर करण्याची अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आली होती. त्यानुसार फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. आरएफ आणि जीईएपीपीसारख्या संस्थांच्या सहकार्यातून अत्याधुनिक एआय आधारित जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म हा देशातील इतर वीज कंपन्यांसाठी आदर्श ठरेल. वीज वितरण क्षेत्रातील कंपन्यासाठी हा एक आदर्श मानदंड असेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –  बीड-वडवणी मार्गवर शनिवारी रेल्वे इंजिन धावणार, पुणे रेल्वे विभागाच्या नागरिकांना महत्वाच्या सूचना

ग्राहक सेवा उन्नत करण्यासाठी आणि महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एआय-आधारित निर्णय-सहाय्यक साधने अत्यंत उपयुक्त आहेत. महावितरण कंपनीसाठी विकसित होणाऱ्या उपाययोजना वीज वितरण क्षेत्रातील दीर्घकालीन, शाश्वत आणि परिणामकारक सहाय्यभूत असतील, असा दृढ विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

वीज वितरणमध्ये ‘डिजिटल ट्वीन’ पद्धती विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. नाविन्यपूर्ण एआय -आधारित उपक्रमातून शाश्वत पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढण्यासाठी ग्रामीण भागात मोठे बदल होतील.

राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी आणि वीज ग्राहकांना या नवीन डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक विश्वसनीय व पुरेशी वीज उपलब्ध होईल. वीज प्रवाहाची अचूकता, क्षेत्रीय कामकाज आणि ऊर्जा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे. या उपक्रमामध्ये, वीज नेटवर्कचे डिजिटल मॉडेल तयार केले जात आहे. त्यामुळे वीज प्रवाहाचे विश्लेषण, ग्रीडची ऑप्टिमायझेशन, वीज आउटेज नियोजन, नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांचे (आरई) अधिक चांगले समायोजन होईल. विद्युत वाहिन्यांच्या देखभालीसाठी अधिक जागरूक नियोजन तसेच शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा वापर यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली काम करेल.

ही डिजिटल प्रणाली महावितरणमध्ये लागू केल्याने सध्या येत असलेल्या तांत्रिक किचकट अडचणी दूर होतील. या नव्या प्रणालीमुळे एक टक्का वीज गळती कमी झाली, तरी वर्षाला सुमारे एक ते दीड हजार कोटी रुपयांची बचत होऊन नुकसानीत मोठी घट होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button