Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

‘संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर उपचार करावेत’; मनसे नेत्याची टीका

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला, तर ते न्यायाधिशांना सुद्धा शिव्या घालतील

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला. यावेळी संजय राऊतांना हल्ल्याबाबत विचारणा केली असता, संदीप देशपांडे कोण आहेत? असा प्रश्न विचारला होता. दरम्यान, यावरून संदीप देशपांडे यांनी राऊतांवर खोचक टीका केली आहे.

संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. मी पत्र लिहून त्यांच्याप्रती काळजी केली होती. त्यांना सारखं वाटतं की त्यांची कोणीतरी सुपारी दिली, ते सतत हल्ल्यासंदर्भात बोलत असतात. याला-त्याला शिव्या घालत असतात. उद्या जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला, तर ते न्यायाधिशांना सुद्धा शिव्या घातल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असं संदीप देशपांडे म्हणाले.

मला संजय राऊतांबद्दल सहानुभूती आहे. त्यांच्यावर उपचार झाले पाहिजे. उद्धव ठाकरे तर मोठे डॉक्टर आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर उपचार करायला हरकत नाही, अशी खोचक टीका संदीप देशपांडे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button