WPL 2023 : महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरूवात; क्रिती सेनन, कियारा अडवाणी करणार परफॉर्मन्स

WPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरूवात होत आहे. भव्य उद्घाटन सोहळ्याची बीसीसीआयने मोठी तयारी केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि कियारा अडवाणी सुरूवातीला परपॉर्म करणार आहेत. याबरोबरच गायक एपी ढिल्लन देखील परफॉर्म करणार आहे.
महिला प्रीमियर लीगसाठी बीसीसीआयने स्पर्धेचे अँथम साँग देखील काढले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या साँगचा व्हिडीओ शेअर केला आहे. महिला प्रीमियकर लिगचा सलामीचा सामना सुरू होताच ऊर्जा आणि उत्साहाचे साक्षीदार व्हा! असं लिहलं आहे.
या गाण्यात प्रसिद्ध गायक शंकर महादेवनसह सहा कलाकारांनी आपाला आवाज दिला आहे. या व्हिडीओत शफाली वर्माही दिसत आहे.
सोबतच, मुंबई इंडियन्सने देखील अँथम साँग रिलीज केले आहे. ज्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर आणि संघातील इतर खेळाडू देखील उत्साहाने भरलेले दिसत आहेत.
महिला प्रीमीयर लीगच्या पहिल्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि युपी वॉरियर्स या एकूण पाच संघांनी भाग घेतला आहे. या पाच संघांमध्ये एकूण २२ सामने होणार आहेत. हे सामने मुबईत खेळवले जाणार आहेत.





