पुढील ३६ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर वाढला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Maharashtra Weather | दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावत आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये पुढील तीन दिवस म्हणजे २३ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगरात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, पुढील २४ तास वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत’; काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे विधान
कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.





