Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नागपुरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात
नागपूर – नागपूर शहर आणि परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच शहराच्या काही भागांत पावसाच्या सरीही होसल्ल्या आणि पाहता पाहता ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शहराच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील काही विभागात अगोदरच पावसाचा इशारा दिला होता. विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच नागपुरात उद्यादेखील वादळ आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर 20 मार्चपर्यंत शहर आणि अन्य भागांत ढगाळ वातावरण राहणार, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. पाऊस आणि गारपिटीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.





