Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाची तयारी पूर्ण, ‘या’ दिवशी लागणार निकाल

पुणे : मागील आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आता दहावीच्या परीक्षाचा निकाल कधी जाहीर केला जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच १ जून ते ५ जून दरम्यान निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेत लावला होता. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेचा निकाल देखील वेळेत लावण्यासाठी बोर्डाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले आहेत.
हेही वाचा – Weather Update : राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
बोर्डाने निकाल जाहील केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो https://mahresult.nic.in/ , https://www.mahahsscboard.in/ या वेबसाईटवर पाहता येणार आहे.





