Weather Update : राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : देशासह राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही उकाड्याने नागरिकांना हैराण केलं आहे. त्यातच आता आजही काही भागांमध्ये पावसाची शक्यता आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये अशंत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही झालं आहे.
हेही वाचा – शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार?
१ जून रोजी दक्षिण कोकणातल जिल्ह्यांमध्ये अंशत: ढगाळ हवामानाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यावेळी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आकाश निरभ्र राहून सूर्यप्रकाशाची शक्यता आहे.





