Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती

नवी दिल्ली : भारताच्या विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत पाकिस्तानला खडसावलं आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं हे निंदनीय असल्याचं विक्रम मिस्री यांनी म्हटलं.

हेही वाचा –  “काय झाले युद्धबंदीचे? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत”, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले ट्विट

विक्रम मिस्री म्हणाले….

गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून उल्लंघन केलं जात आहे. भारतीय सैन्याकडून याचं उत्तर दिलं जात आहे. या सीमेवरील अतिक्रमणाचा सामना करत आहे. हे अत्यंत निंदनीय असून पाकिस्तान याला जबाबदार आहे. पाकिस्ताननं हे गांभीर्यानं घ्यावं आणि अतिक्रमण रोखण्यासाठी तातडीनं योग्य कारवाई करावी. सैन्याचं यावर योग्य लक्ष आहे. कोणत्याही अतिक्रमणाचा सामना करण्यासाठी आणि रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या काही तासांपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तान केलं जातंय. दोन्ही देशांच्या डीजीएमओकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं उल्लंघन करण्यात आलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button