Breaking-newsपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

डॉ. सुशांत पाटील ग्रुपच्या वारीसेवा २०२६ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; २०० हून अधिक स्वयंसेवकांनी २२ तास अखंड सेवा बजावली

पुणे: अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या “डॉ. सुशांत पाटील ग्रुप वारीसेवा २०२६” या सेवाभावी उपक्रमाची यंदा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी सांगता झाली. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सेवेसाठी तब्बल २०० हून अधिक स्वयंसेवक, डॉ. सुशांत पाटील ग्रुपचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सलग २२ तासांहून अधिक काळ निस्वार्थपणे सेवा दिली.

हेही वाचा –  IND vs ENG 2nd ODI ची वेळ बदलली, टीम इंडियाचा कॅप्टनही बदलला जाणार, अचानक असं होण्यामागचं कारण काय?

या सेवा उपक्रमात हजारो वारकऱ्यांना गरमागरम भोजन, पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट व छत्र्यांचे वितरण, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच इतर आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. यासोबतच विठ्ठल भक्तीमय वातावरण अधिक आनंददायी करण्यासाठी भजन, अभंग आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमामागे संस्थापक डॉ. सुशांत व्ही. पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक ॲड. अनुजा सुशांत पाटील यांचे प्रेरणादायी नेतृत्व लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. तसेच कार्यकारी संचालक मा. विद्यानंद मानकर सर यांनीही या सेवाकार्यात मोलाचे सहकार्य केले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. सुरेश माळी, डॉ. सुरेश शिरभादुरकर, डॉ. मेघना भिलारे, प्रो. राजाराम गोलगिरे, केंद्रीय कुलसचिव श्री. प्रदीप खांडवे, मुख्य लेखाधिकारी श्री. संजय भोर, तसेच मुख्य वित्त अधिकारी (CFO) श्री. रोहन पवार, यांची विशेष उपस्थिती लाभली.या संपूर्ण वारीसेवा उपक्रमाचे क्रिएटिव्ह आणि कल्चरल डायरेक्टर श्री. श्रेयस देशपांडे यांनी प्रभावी समन्वय साधत यशस्वी नियोजन केले.

विद्यार्थी व स्वयंसेवक व्यवस्थापनाची जबाबदारी राजवर्धन गडेकर, एचआर मधुरा शिंदे, एचआर मिहीर जाधव, ईए नॅन्सी कोवान, सिद्धू जाधव, प्रा. आकाश गायकवाड, इंदू सिंह, श्रद्धा पेंडलवार, प्रा. सुमित हुलावळे, निखिला आल्हाट, सविता मोरे, रामेश्वर शेंडगे आणि एचआर प्राची यांनी यशस्वीरित्या सांभाळली.

सांस्कृतिक समितीचे नेतृत्व सिद्धू जाधव यांनी केले.

अन्न तयार करणे व वितरण व्यवस्थापन परमेश्वर राऊत, अतुल धुमाळ, विठ्ठल राऊत आणि सूरज यांनी केले. तर खरेदी व साहित्य वितरणाची जबाबदारी जीवन बाजारे, सुशांत जोशी, अक्षय आणि लक्ष्मण मस्तुदे, समीर, अजित यांनी सांभाळली.उपक्रमाचे चित्रीकरण व Social Media जबाबदारी उन्मेष कोरडे, मंगेश ढोले, जय पाटोळे, निखिल लाडे, राजू पळसकर, विवेक जोरी, शुभम हार्डीकर, राज इंगोले आणि त्यांच्या मीडिया टीमने उत्कृष्टरीत्या पार पाडली.

याशिवाय मयूर तातुसकर, अंकुर शिवरकर आणि संदीप इनामके स्टुडिओ यांनी निःस्वार्थपणे दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.या उपक्रमाच्या यशात २०० हून अधिक स्वयंसेवकांचे समर्पण, सेवाभाव आणि विठ्ठल भक्ती हेच खरे बळ ठरले. “सेवाच ही खरी भक्ती” हा संदेश देत डॉ. सुशांत पाटील ग्रुपने सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श समाजासमोर ठेवला.

“माऊली माऊली!” च्या अखंड जयघोषात हा सेवायज्ञ अविस्मरणीय ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button