Monsoon Update : कोकणाला अतिवृष्टीचा तर ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून लांबलो होता. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस दाखल झाला आहे. हवामान खात्याने पुन्हा मान्सूनचा इशारा दिला आहे. पुढील ३ ते ४ दिवस राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील ४ ते ५ दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. पुढील ३ ते ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीता इशारा दिला आहे. कृपया भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार योजना करा काळजी घ्या.
हेही वाचा – IND vs WI : वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहरांना ओलंचिंब केलं आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1676519650744766464?
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, नागपूर, गोंदिया या भारातही येत्या काळात पाऊस जोर धरणार आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.





