आता फेस रिडींगद्वारे गुन्हेगार ओळखता येणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली माहिती

Yogesh Kadam : राज्यात आर्टिफिशीअल इंटेलिजन्सचा उपयोग असलेले सीसीटिव्ही कॅमरे लावणार आहेत. त्या सीसीटिव्हीत कॅमेर्यांद्वारे ‘फेस रिडिंग’ द्वारे गुन्हेगारांची ओळख होईल. तसेच कुणाकडे शस्त्र असल्यास तेही या कॅमेर्यांमध्ये स्कॅन होऊन स्थळ कळू शकेल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. सिद्धार्थ शिरोळे यांनी पुण्यातील बिघडलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्यांबाबत विधानसभागृहाचे लक्ष्य वेधले.
त्याला उतर देताना योगेश कदम म्हणाले, पुणे येथे एकूण सीसीटिव्ही कॅमेर्यांपैकी ४२२७ गृहविभागाने, २२५० महानगरपालिकेने, तर २००० कॅमेरे मेट्रोद्वारे लावले आहेत. २ टप्प्यांमध्ये हे कॅमेरे लावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या दुरुस्तीचा कालावधी ६ वर्षांचा आहे. दुरुस्ती न झाल्यामुळे पुणे येथील १३०० सीसीटिव्ही कॅमरे बंद आहेत. तथापि या बंद कॅमेर्यांची दुरुस्ती करताना कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हेही वाचा – SBI च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची माहिती, ‘या’ स्मार्टफोन्समध्ये वापरता येणार नाही YONO अॅप
राज्यातील सीसीटिव्ही कॅमेरे विविध विभागांद्वारे लावले जातात. विविध विभागांद्वारे कॅमरे लावण्यात आले तरी त्या सर्वांचे संचालन एकाच ठिकाणी करता येईल, अशी कार्यपद्धती सदस्यांनी सूचना केल्याप्रमाणे करण्यात येईल. यासाठी नगरविकास, गृह आणि औद्योगिक प्रशिक्षण या विभागांची एकत्रित बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला सभागृह सदस्यांनाही बोलावण्यात येईल. पण भविष्यात सर्व विभागांकडून लावण्यात येणार्या सीसीटिव्ही कॅमेर्यांमध्ये आर्टिफिशीअल ईन्टेंलिजन्सचा उपयोग करण्याविषयीचे धोरण आधी निश्चित केले जाईल, असेही कदमांनी स्पष्ट केले.