Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#NisargCyclone: वादळाच्या तडाख्याने मंडणगडमध्ये घरे भुईसपाट

मंडणगड तालुक्यात खाडी पट्टय़ातील गावांना ‘निसर्ग’ वादळाने मोठा तडाखा दिला. यात काही गावांतील घरे वारा आणि पावसाच्या माऱ्याने भुईसपाट झाली आहेत.
काही गावांत छपरांची घरे भुईसपाट झाली आहेत. तर काही ठिकाणी सीमेंटच्या पत्र्याची छपरे उडून गेली आहेत. किंजळघर, आंबवणे बुद्रुक, शिगवण ,आंबडवे, घोसाळे पनदेरी, उंबरशेत,पेवेकोंड, वेळास, बाणकोट आणि वाल्मीकीनगरातील घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सावित्री नदीकाठी असलेल्या आंबवणे गावाचा इतर परिसराशी असलेला संपर्क पूर्णत: तुटला आहे.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काही घरांतील धान्याची पोती भिजली आहेत. तर काही गावांतील मातीची घरे वाहून गेली आहेत. काही गावांतील रस्ते वाहून गेले आहेत.





