ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

निगडी भक्ती-शक्ती मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

दुरुस्तीची जबाबदारी कुणाची? भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका प्रशासनाला ठणकावून विचारला सवाल

पिंपरी : पिंपरी ते निगडी दरम्यानच्या भक्ती-शक्ती मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या या प्रमुख रस्त्याने नागरिकांचा जीव मुठीत गेला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे नजरेस न पडता अपघात होण्याची शक्यता वाढली असून अनेक नागरिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका प्रशासनाला ठणकावून मागणी केली आहे की, “निगडी बीआरटी बसस्टॉप ते आकुर्डी खंडोबा माळ दरम्यानच्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.” त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप करत, तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा –  राज्यात ५६ नद्या प्रदूषित; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात हलगर्जीपणा, पर्यावरण मंत्री मुंडे यांची माहिती

मधुकर पवळे उड्डाणपूलाजवळील बीआरटी बस थांबा ते आकुर्डी खंडोबा माळ या दरम्यानचे रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने व पावसाळ्यात योग्य देखभाल न झाल्याने खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून जबाबदारीची ढकलाढकली सुरू झाली आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि मेट्रो प्रशासन यांच्यात दुरुस्तीचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे.

नागरिकांनी देखील या समस्येवर तीव्र संताप व्यक्त केला असून, जर वेळेत उपाययोजना न झाल्यास “निगडी टिळक चौकात रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांचा जीव धोक्यात न येण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button