Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज ठाकरेंचे जातिव्यवस्थेविषयी मोठं विधान; म्हणाले..

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रक्तदान शिबिर आणि जातीयव्यवस्थेवर आपलं मत स्पष्ट केलं आहे. ते भाईंदर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, पूर्वी स्वत:च्या जातीबद्दल अभिमान असायचा. राजकारण्यांनी इतका गोंधळ घातला आहे की आता स्वत:च्या जातीबद्दल अहंकार सोडा, दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वोष निर्माण केली आहे. स्वत:च्या जातीचा अहंकार, दुसऱ्या जातीचा द्वेष अशा वृत्तीच्या लोकांनी रक्तदान शिबिर ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा – Bigg Boss OTT सीझन 2 च्या सुरूवातीलाच एक लोकप्रिय खेळाडू बाहेर

हॉस्पिटलमध्ये येणारं ब्लड बँकेतील रक्त त्यावर ओ पॉझिटीव्ह, ओ निगेटीव्ह असंच लिहिलेलं असतं. त्यावर कोणत्या जातीच्या माणसाने रक्त दिलंय हे लिहिलेलं नसतं. त्यामुळे ज्या जातींचा द्वेष आपण आजपर्यंत करत आलो कदाचित ज्या जातीचं रक्त आज आपल्या अंगात चढवलं असेल तेव्हा तुम्ही काय करणार आहेत? ही जात आवडत नाही म्हणून तुम्ही काढून टाकणार आहात? काढून तर बघा, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button