नवीन वर्षाची शेतकऱ्यांना भेट! राज्य सरकारचा मोठा निर्णय; 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी…

Agriculture News : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेती व पीक कर्जाशी संबंधित व्यवहारांवर लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नवीन वर्षाताची भेट दिली आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या सर्व शेती आणि पीक कर्ज व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबतचा अधिकृत आदेश महसूल व वन विभागाकडून जारी केला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विविध कर्ज घेताना कायदेशीर प्रक्रियांमुळे आर्थिक भार सहन करावा लागत होता. आता नवीन निर्णयामुळे कर्ज प्रक्रिया सुलभ करून कर्ज घेताना असून शेतकऱ्यांच्या खिशालावरील अतिरिक्त भार कमी होणार आहे. कर्ज करारनामा, गहाणखत, तारण, हमीपत्र, तसेच गहाणाचे सूचनापत्र यांसारख्या कागदपत्रांवर लागणारे मुद्रांक शुल्क अनेकांसाठी अतिरिक्त खर्चाचे कारण ठरत होते.
हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या पीएसआय वयोमर्यादेचा फटका राज्यातील किती विद्यार्थ्यांना बसणार?
शेती हे जोखमीचे व्यवसाय असून निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पीक कर्ज हेच शेतकऱ्यांचे मोठे आधारस्तंभ असते. मात्र, कर्ज घेताना होणारा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत होता. हे लक्षात घेऊन सरकारने मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या निर्णयाचा लाभ राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका तसेच ग्रामीण भागातील बँकांमार्फत शेती व पीक कर्ज व्यवहांना मिळणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या सर्व संबंधित दस्तऐवजांवर कोणतेही मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही. या महत्वपूर्ण निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




